अरिजित सिंगची गायनातून निवृत्ती

Facebook
WhatsApp
Telegram

“मला जेव्हा वाटेल की आता आयुष्यात करण्यासारखे काही राहिलेले नाही, त्यावेळी मी सर्व काही बाजूला ठेवून अशा ठिकाणी जाऊन बसेन जिथे मला मनःशांती मिळेल ….. हे विचार आहेत सुप्रसिद्ध पार्श्वगायक अरजीत सिंग याचे ….. काही दिवसांपूर्वीच त्याने पार्श्वगायन क्षेत्रातून निवृत्ती जाहीर केली ….. वय वर्ष अवघे 38 ….. कठोर परिश्रमानंतर यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेला ….. एका गाण्यासाठी जवळपास दहा लाख रुपये आणि दोन तासांच्या कॉन्सर्ट मधून जवळपास आठ ते दहा कोटीची कमाई ….. एकूण मालमत्ता 414 कोटींची ….. इतकं सर्व असूनही मनात, सर्व काही सोडून एका शांत जागी जाऊन बसावे असे विचार मनात येणं हे आश्चर्यकारक वाटत असतील ना ? ….. पण हल्लीच्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या युगात स्वतःचे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य हरवत चालले आहे …… पार्श्वगायन म्हणजे एक प्रकारे दुसऱ्याच्या हाताखाली काम करणेच ….. जेथे समोरच्याला जसे आवडेल तसे काम करायचे ….. मग तेथे स्वतःच्या कल्पकतेला थारा नसतो …… सर्वसाधारणपणे आपण सर्वच सध्या अशाच प्रकारे आयुष्य जगत असतो …. रोजचे ट्राफिक, सकाळी उठताच मनावरचा भार, टारगेटची कटकट, बॉसचा मूड, टीमची पॉलिटिक्स आणि डोक्यात घर करून बसलेली भीती आज काही चुकलं तर उद्या काय होईल ? …. सहा दिवस मन मारून जगायचं आणि वीकेंडला पार्टी, बाहेर जेवण यालाच एन्जॉय म्हणायचं ….. सोमवारी पुन्हा तीच घुसमट ….. हे आयुष्य नाही स्वतःला हळूहळू मारण्याची सवय आहे …. जिथे रोज स्वतःला समजवावं लागतं की सगळं “नॉर्मल” आहे …. पण स्वतःचा आत्मा मात्र हरलेला असतो ….. खरंतर आयुष्य म्हणजे स्वतःचा वेळ, स्वतःचा सन्मान आणि स्वतःच्या निर्णयाची किंमत ….. बाकी सगळं जगणं नाही तर केवळ तग धरण असतं ….. अरजीतला हे लक्षात आणि त्यांन निर्णय घेतला स्वतःसाठी जगण्याचा ….. हा निर्णय घेण्याआधी जवळपास सात एक महिन्यांपूर्वीच तो उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये जाऊन महादेवाच्या चरणी लिन झाला होता …… कारण मनःशांतीसाठी मंदिराचा उंबरठा हेच अंतिम ठिकाण आहे.

“When I feel that there is nothing left to do in life, I will put everything aside and go and sit in a place where I can find peace of mind…” These are the thoughts of the renowned playback singer Arijit Singh… Just a few days ago, he announced his retirement from playback singing… At the young age of 38… Having reached the pinnacle of success after hard work… Earning approximately ten lakh rupees for a single song and around eight to ten crores from a two-hour concert… With a total net worth of 414 crores… Isn’t it surprising that despite all this, he has thoughts of leaving everything behind and going to a peaceful place? … But in today’s competitive and hectic world, the freedom to live one’s own life is being lost… Playback singing is, in a way, working under someone else… Where you have to work according to what the other person likes… There is no room for one’s own creativity… Generally, we all live our lives in this way… Daily traffic, the burden on our minds as soon as we wake up in the morning, the hassle of targets, the boss’s mood, team politics, and the fear that has taken root in our minds: what will happen tomorrow if something goes wrong today? … We live six days suppressing our feelings and call partying and eating out on the weekend “enjoyment”… On Monday, the same suffocation returns… This is not life, but a habit of slowly killing oneself… Where you have to convince yourself every day that everything is “normal”… But your own soul is lost… In reality, life means valuing your own time, your own respect, and your own decisions… Everything else is not living, but merely surviving… Arijit realized this and decided to live for himself… Before making this decision, about seven months ago, he had gone to the Mahakal temple in Ujjain and surrendered himself at the feet of Lord Shiva… Because the threshold of a temple is the ultimate place for peace of mind.

Leave a Reply

From Most Popular Categories