
*पु.ल. – ‘ व्हता ‘ बरोबर की ‘होता ‘?*
*श्रोता – अर्थात ‘होता’, ‘व्हता’ चूक.*
*पु.ल. – ‘व्हता’ चूक तर ‘नव्हता’ कुठून आलं?*
🤔 😂😅🤣
*असो, एवढं सोपं नाही ते…* 😅
😄
———————————————————–
काका बँकेत खाते उघडायला गेले. व्यवस्थापकांनी त्याना एक अर्ज भरायला दिला. त्यावर लिहिले होते ” नमुन्याची सही”.
काका भडकले आणि त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी व्यवस्थापकांना विचारले की मी नमुना आहे का? व्यवस्थापकांनी माफी मागितली आणि अर्जावर लिहीले ” सहीचा नमुना “.
मातृभाषे मध्ये फक्त शब्दांना नव्हे तर क्रमाला सुद्धा महत्त्व असते.
😄
———————————————————–
मराठी भाषेची कमाल आणि धमाल….”पण” हा एकच शब्द वाक्यातली जागा बदलली, तर अर्थ किती बदलतो बघा…….
*पण* तो तिच्यावर प्रेम करतो..
तो *पण* तिच्यावर प्रेम करतो
तो तिच्यावर *पण* प्रेम करतो
तो तिच्यावर प्रेम *पण* करतो
तो तिच्यावर प्रेम करतो *पण*….
😄
———————————————————–
लग्नापूर्वी,
ती त्याला म्हणाली
*”ते बघ…ते झाड”*….!!
आणि त्याच्या मनात अनेक रोमॅन्टिक आठवणी जाग्या झाल्या
लग्नानंतर,
ती त्याला म्हणाली,
*”ते बघ……. ते झाड “*
आणि, मुकाट्याने त्याने कोपर्यातला झाडू उचलला.
*शब्द तेच पण वेळेनुसार परिणामात बदल !*
*मराठी भाषेची कमाल, अजून काय*
🤣😂🤣😂😊






